पिंपरी (Pclive7.com):- बालदिनाचे औचित्य साधून विमल कदम व साक्षी त्रिभुवण या बाल सर्प मैत्रिणींनी सर्पांची माहिती देत अनोख्या पध्दतीने बाल दिन साजरा केला.
केवळ साप हे नाव घेतलं तर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. मनात भीती निर्माण होते. मात्र सर्पांना न घाबरता त्यांना वाचविण्याचा विडा उचलून प्रयत्नशील असणारा युवक म्हणजे भोसरीतील सर्प मित्र राजेश कदम. केवळ आपणच नाही तर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ही त्यांनी सर्प पकडण्याचे प्रशिक्षण दिले असून त्यांची लहान कन्या सर्प मैत्रिण विमल न घाबरता सर्प पकडते. बाल दिनानिमित्त इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी विमल व सर्प मित्र बाबासाहेब त्रिभुवण यांची इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणारी कन्या सर्प मैत्रिण साक्षी या दोघींनीही सर्पांविषयीचा जनजागृती केली.
सापांपासून शेतकऱ्यांना होणारे फायदे, तसेच सर्पदंशाची कारणे तसेच लक्षणे, साप कोठे व कसे राहतात, विषारी व बिनविषारी साप कसे ओळखायचे, यांसह त्यावरील प्राथमिक उपचार, साप हा निसर्ग चक्रामधील किती महत्त्वाचा दुवा आहे. सापांच्या विषांपासून निर्माण करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती, अशा विविध विषयांची माहिती या माध्यमातून देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष सापांचे प्रात्यक्षिक केले व उपस्थित मुलांच्या अनेक शंकांचे निरसन केले.






















Join Our Whatsapp Group