पिंपरी (Pclive7.com):- युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख विश्वजीत बारणे यांची मावळ व पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड युवासेनेकडून पुणेरी पगडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

‘गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक’ या तत्त्वावर पुणे लोकसभा व मावळ लोकसभेमध्ये संघटनेचे काम करू, तसेच शिवसेना भाजपा सरकारच्या सर्व योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देऊ असे प्रतिपादन विश्वजीत बारणे यांनी यावेळी केले.

ह्या वेळेस शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख निलेश तरस, बशीर सुतार, अविनाश जाधव, मनोज काची, संदीप घुले, चिंचाप्पा निंगदोळे उपस्थित होते. सत्काराचे आयोजन पिंपरी व अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.

























Join Our Whatsapp Group