पिंपरी (Pclive7.com):- गायत्री गॅस सर्व्हिस दुकानात विधी संघर्षित बालक व आरोपी तसेच संस्कृती गॅस सर्व्हिस या दुकानात आरोपी हे घरगुती भरलेल्या सिलेंडरमधील गॅस मोकळ्या सिलेंडरमध्ये विनापरवाना भरत होते. आरोपींनी जिवनाआवश्यक वस्तुबाबत शासन व ग्राहकाची संगणमताने जाणीवपुर्वक फसवणुक केली आहे.

ही घटना (दि १३) रोजी १२.१० च्या सुमारास खंडेवस्ती, आंबेडकर चौक, संत नामदेव पथ, एम.आय.डी.सी. भोसरी येथे घडली.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २०२/२०२३ भा.दं.वि कलम ४२०, २८५, जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ नुसार नितीन मोहन वाघमारे, धनराज देवीदास बिरादार, विधी संघर्षीत बालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.























Join Our Whatsapp Group