पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रावेत, आकुर्डी परिसरात नव्याने उदयास आलेल्या रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. हा खून टोळीच्या वर्चस्वातून आकुर्डी येथील शीतळादेवी मंदिराजवळ सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला.
खून झालेल्या अनिकेत याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एक महिन्यापूर्वी रमाबाई वसाहत आकुर्डी येथे महाकाली टोळीचा प्रमुख हनम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्यामध्ये फरार होता.
सोमवारी रात्री अज्ञातांनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. हा खून टोळी वर्चस्वातून झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रात्री निगडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्याची बॉडी शवविच्छेदनासाठी वायसीएम रूग्णालयात पाठवण्यात आली. पोलीस मारेकऱ्यांचा तपास करीत आहेत.