पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील बीआरटी मार्गावर बस चालकाविनाच धावली. बस उतारावर असल्यामुळे अचानक वेगात धावू लागली अन् जवळच असलेल्या फुटपाथवर जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्राकरामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये ३ दुचाकींचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी पीएमपीची बस (एम एच १२- के क्यू ०२१०) जुन्नर-नारायणगावला जाणा-या भोसरीतील एसटी बसच्या समोर असलेल्या बीआरटी बस थांब्यावर थांबली होती. या बसमध्ये चालक नव्हता. उतार असल्याने ती बस अचानक सुरू झाली आणि सुसाट धावत थेट जवळच्या फूटपाथवर जाऊन आदळली. कुणाला काही समजायच्या आत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सकाळची वेळ वर्दळीची असते, अनेक पथारीवाले त्यांची दुकाने मांडत असतात. यावेळी ही बस अचानक धावत येताना पाहून सगळ्यांची एकच पळापळ झाली. चपलांचे दुकान मांडणारा एकजण बस खाली येता-येता थोडक्यात बचावला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पळापळ केल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, ३ दुचाक्यांचे नुकसान झाले.






















Join Our Whatsapp Group