पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याचे कृत्य केले, हे अतिक्षय लज्जास्पद आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे हे कृत्य आहे. एखादा नेता अशा प्रकारचं वक्तव्य करतो, मिडीयासमोर थुंकतोय हे अशोभनीय आहे.
द्वेशापोटी एखाद्या नेत्यानी किती खालची पातळी गाठली आहे याचे खासदार राऊत हे उत्तम उदाहरण आहेत. खरंतर संजय राऊत यांना ‘ग’ची बाधा म्हणजेच गर्व झाला आहे. दररोज मिडीयाचे प्रतिनिधी त्यांच्याकडे जातात, प्रसिध्दी देतात त्याचा राऊत यांना गर्व झाला असल्याची टीका मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे संजय राऊत यांच्या मुलाप्रमाणे आहेत. श्रीकांत शिंदे यांनी कायम संजय राऊत यांना आदर दिला आहे. असे असताना केवळ व्देशापोटी अशाप्रकारचं थुंकण त्यांना शोभत नाही. ते एक पत्रकार, लोकप्रतिनिधी आहेत. महाराष्ट्रातील जनता अशा प्रकारचे कृत्य कदापी सहन करणार नाही. त्यांच्या या कृत्याचा मी निषेध करतो असे खासदार बारणे म्हणाले.