ओडिशा (Pclive7.com):- ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ANI या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही ५० झाली आता ANI ने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.
अपघात कसा झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस ट्रेन क्रमांक १२८४१ चे कोच बी २ ते बी ९ हे डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर बी १ हा कोच आणि इंजिनही रुळावरुन घसरलं. त्यानंतर मालगाडीची टक्कर झाली. जे लोक एसी बोगीमध्ये बसले होते त्या प्रवाशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे असंही रेल्वेच्या प्रेस रिलिजमध्ये म्हटलं आहे. हावडा मेलची ही टक्कर या दरम्यान झाली. एनडीआरएफ आणि लष्कराने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.