पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी हर्षु कांबळे हिचा गेल्या दोन वर्षातील जीवनप्रवास एकदम हटके आहे. आयटी इंजिनिअर म्हणून आपल्या आपल्या करिअरची सुरूवात करून ती आता चक्क मॉडेलिंगच्या क्षेत्रात उंच शिखरावर पोहचली आहे.
दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात आय टी इंजिनिअर म्हणून तिने आपले करिअर सुरू केले. हिंजवडी येथे एका चांगल्या कंपनीत ती कामालाही लागली होती. पण तिच्या आयुष्याला एक टर्निंगपॉईट मिळाला. अचानक एका मित्राने तिला एका ऍड मध्ये मध्ये काम करण्याची विचारणा केली. आणि ती अपघाताने मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. तिथून पुढे हर्षु कांबळे हिचा फॅशन विश्वाचा सोनेरी प्रवास सूर झाला. अनेक नामांकित ऍड मध्ये काम करत असताना तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण सर्वाधिक यश मिळाले तिला सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत. तिला एशिया पॅसिफिक युनिक रनअवेचा ‘किताब’ मिळाला. एकीकडे फॅशन विश्वात चमकदार कामगिरी करत असताना तिला एका वेबसिरीजमध्ये लीड रोल देखील मिळाला. तर एका भोजपुरी चित्रपटात ही ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासर्व रंजक प्रवासात ती आज सिंगापूरमध्ये मिस्टर अँण्ड मिसेस इंडिया एशिया पॅसिफिकच्या डिरेक्टर पदावर कार्यरत आहे.
हर्षु कांबळे हिचा हा प्रवास म्हणावा तेवढा सोपाही नव्हता. दोन वर्षांच्या या खडतर प्रवासात तिला त्रास झाला. पण आता आणखी चमकदार कामगिरी करण्याचा तिचा विचार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर ते मॉडेल अभिनेत्री हा हर्षुचा प्रवास फॅशन जगतात काही करू पाहणाऱ्या तरुणींना नक्कीच प्रेरणा देणारा आहे.





















Join Our Whatsapp Group