पिंपरी (Pclive7.com):- केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. या नाकर्ते सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या रविवारी दि.२६ रोजी ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी कळविले आहे.
आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आज खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका संगिता ताम्हणे, नगरसेवक संजय वाबळे, सरचिटणीस फजल शेख, आनंदा यादव, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप,विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, संतोष वाघेरे, रशिद सय्यद आदी उपस्थित होते.
रविवारी दि.२६ रोजी दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हनुमान मंदीर, आकुर्डी गावठाण, ते तहसील कार्यालय प्राधिकरण येथे धडकणार असून मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. फसलेली नोटबंदी, पूर्णतः फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, बिघडलेली कायदा-सुव्यस्था,लोडशेडिंग, उद्
या आंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच सरकारच्या कारभाराला कंटाळलेल्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group