पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्या पत्रकारांवर समाजाला चांगली दिशा दाखवणे, समाजातील वाईट प्रवृत्तींचा पोलखोल करणाचे जबाबदारीचे काम असते. त्यामुळे ही जबाबदारी पेलण्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असावे, यासाठी त्यांनी नियमीत आरोग्य तपासणी करुन काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत चिंचवड येथील सेव्हन ऑरेंज रुग्णालयाचे मत वैद्यकीय संचालक डॉ. निखिल हिरेमठ यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड, पवनानगर येथील सेव्हन ऑरेंज रुग्णालयात पत्रकार आणि त्यांचे कुटूंबीय यांच्या वेगवेगळ्या आरोग्य तपासणी शिवीराचे गुरुवारी आयोजन केले होते. या शिबीरास पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिवीरात ईसीजी, रक्तशर्करा आणि थायरॉड या आजारासह इतरही तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन तसेच औषध उपचार देण्यात आले. यावेळी पत्रकारांना आरोग्याविषयी वेगवेगळ्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
मल्टिस्पेशालिस्ट असणार्या या सर्व सोयीयुक्त रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबीरास रुग्णालयाचे डॉ. हिरेमठ, अशोक सेन, जशनजीत सिंग, मनोज मेनन, डॉ. अर्चना कुडे, डॉ. मोहिनी मांजरे, गुरुजित कौर, शुभांगी पोळ, शिल्पा जोशी, हरविंदर सिंग यांचे सहकार्य लाभले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हेमंत जाधव, सुकृत मोकाशी, अमोल येलमार उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group