पिंपरी (Pclive7.com):- प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांची नाही तर देशातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावेल असा ध्वजस्तंभ उभारणीच काम युध्दपातळीवर सुरू झालंय. देशातला सर्वात उंच असा १०७ मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ असणार आहे.त्याच्यावर मोठ्या धीमाखात भारतीय ध्वज डौलणार आहे.
निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात १०७ मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकविण्यास नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झालयं. मोठमोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी नागरिकांनी हे काम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.





















Join Our Whatsapp Group