पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड मोहननगर येथील एका कंपनीला आज सायंकाळी आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशामक दलातील ३ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आली असून कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग या कंपनीत मशीनचे सुटे भाग बनविण्यात येतात. कंपनीने मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीचे उत्पादन युनिट इतर ठिकाणी हलविले आहे. मोहननगर येथील ही कंपनी मागील दोन महिन्यांपासून बंद होती. आज अचानक पाचच्या सुमारास कंपनीत आग लागली. कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
प्रभारी मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कार्यालयातील सर्व कॉम्प्यूटर्स आदी साहित्य जळाले आहे. तर लेथ मशिन सुरक्षित आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कंपनीत ऑईलचे डबे होते मात्र तिथपर्यंत आग न पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group