इंदिरानगर, चिंचवड येथील संतोषी माता महिला भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक
पिंपरी (Pclive7.com):- कै.सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दि.३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मनीषा स्मृती निवास, भोईरनगर चिंचवड येथे संपन्न झाला. सदर भजन स्पर्धेमध्ये एकूण ३२ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. या भजन स्पर्धेमध्ये इंदिरानगर, चिंचवड येथील संतोषी माता महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना स्मृती चिन्ह व ५००१ रुपये रोख रक्कम देण्यात आले.

रस्टन कॉलनी चिंचवड येथील दत्त प्रासादिक महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना स्मृती चिन्ह व रोख र.रु. ३००१ देण्यात आले . जोगेश्वरी महिला भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना स्मृती चिन्ह व रोख र.रु. २००१ देण्यात आले. चिखली येथील शिवतेज महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ तसेच सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ, संभाजीनगर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. त्यांना स्मृती चिन्ह व रोख रु. १००१ देण्यात आले.

स्वरांजली महील भजनी मंडळातील कान्होपात्रा पवार यांना वैयक्तिक पखवाजवादक, जोगेश्वर महिला भजनी मंडळातील कस्तुरी जमखंडी यांना हार्मोनियमवादक म्हणून तर रेणुका भजनी मंडळाच्या रामेश्वरी कुडाळकर यांना उत्कृष्ट गायक म्हणून बक्षिसे (रोख र.रु.५०१) देण्यात आली. सर्व मंडळांना सहभागी झाल्याबद्दल रोख रककम रु.१००० देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान परीक्षक म्हणून ह.भ.प. मधुकर महाराज मोरे आणि श्री उमेश विठ्ठल पुरोहित यांनी परीक्षण केले. बक्षीस वितरण सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट, माजी नगरसेविका वैशालीताई काळभोर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजभाऊ गोलांडे, आप्पा बागल, विठ्ठल नाना काटे तसेच गतीराम भोईर, दत्तात्रय साकोरे, किरण हर्षवर्धन भोईर, ह.भ.प नीलम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. तर आभार नीलम शिंदे यांनी मानले.
Tags: इंदिरानगरइंदिरानगर चिंचवड येथील संतोषी माता महिला भजनी मंडळाचा प्रथम क्रमांककै.सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महिला भजन स्पर्धा संपन्नचिंचवडपुण्यस्मरण दिनप्रथम क्रमांकभाऊसाहेब भोईरमहिला भजन स्पर्धा संपन्नसंतोषी माता महिला भजनी मंडळ






















Join Our Whatsapp Group