लोणावळा (Pclive7.com):- पुणे–मुंबई एक् सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील खं डाळा बोगद्यामध्ये कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तिन्ही लेनवर कंटेनर पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी वा हतूक ठप्प झाली आहे. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे.

कंटेनर पलटी झाल्यामुळे महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळ्यातील वलवण येथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट् रीय महामार्गावर वळवली आहे.

सध्या कंटेनर हटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवि तहानी झालेली नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group