पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील संत तुकारामनगर येथील रती क्रीएशन एज्युकेशनला ‘बेस्ट एटीसी सेंटर अवॉर्ड इन महाराष्ट्र २०२३’ हा पुरस्कार आहे.

रती क्रीएशन एज्युकेशन, संगणक प्रशिक्षण संस्था संत तुकाराम नगर पिंपरी यांचा ३२ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना संस्थेच्या संचालिका सौ. मेघा सचिन लाड यांनी संस्थेची माहिती दिली. त्यावेळेस संस्थेमधील इतर शिक्षक सहकारी सौ. पूजा समुद्रे, निशा राजगुरू, गायत्री शिरवंडकर, अश्विनी ठोंगीरे, प्रशांत भालेराव, सिद्धांत सदाफुले, साहिल यांच्या कामाचे कौतुक संगणक परीक्षा परिषदचे संचालक/अध्यक्ष रणजीत सुरवसे यांनी केले. त्यावेळेस त्यांनी बेस्ट एटीसी सेंटर अवॉर्ड इन महाराष्ट्र २०२३’ हा पुरस्कार त्यांनी संस्थेला दिला. संगणक शिक्षण पुढील करिअरसाठी किती महत्वाचे आहे हे प्रा.संतोष पाचपुते सर, हेमंत मोरे सर, पराग सर, अश्विनी कांबळे मॅडम, विद्या मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी नगरसेविका सुजाता पलांडे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, चर्मकार महासंघचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस फ्रेंड्स वेलफेयर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी 10 वी 12 वी उत्तीर्ण मुलांचा आणि शिक्षकांचा सत्कार केला. वर्धापन दिनानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे सचिन लाड यांनी आभार मानले.
























Join Our Whatsapp Group