पिंपरी (Pclive7.com):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानकाशेजारील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारप्रबोधन पर्वातील तिसऱ्या दिवशी सकाळी किर्तनकार बाजीराव बांगर महाराज यांनी किर्तनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्रबोधन केले. त्यात त्यांना संतोष राऊत यांनी सहकार्य केले. शांताबाई फेम संजय लोंढे व प्रभू जाचक यांनी प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर केला. न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाने महिलांची मने जिंकली. त्यानंतर व्याख्याती – सिने अभिनेत्री गुरुमित कौर यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात अक्षय डाडर व लखन अडागळे तसेच छाया मोरे आणि पार्टी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि वंचित समाज या विषयवरील परिसंवादात तज्ञांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. सायंकाळी रामलिंग जाधव यांनी संगीतमय गीत गायनाचा, वर्षा रायकर यांनी पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम तर राजू जाधव व रविंद्र खोमणे यांनी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली.

उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता निमंत्रित कवींचे संमेलन, सकाळी ११ वाजता सारिका नगरकर यांचा प्रबोधनपर लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.३० छाया कोकाटे यांचा वंदन करू अण्णा भाऊं साठेंना तर दुपारी २ वाजता मयूर खुडे यांचा चंद्राची चांदणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दुपारी ३.३० वाजता शामसन चंदनशिवे व श्री. राजु डेव्हिड यांचा गौरव आण्णाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजता उद्योजकता कार्यशाळा अंतर्गत विविध मान्यवरांसमवेत संवाद यावेळी कैलास आदे (सहाय्यक समाजकल्याण अधिकारी), अनिल म्हस्के (व्यवस्थापकीय संचालक. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंडळ), महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे, जिल्हा व्यवस्थापक, खादी ग्राम उद्योग, समाज विकास अधिकारी पि.चि.म.न.पा, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुरेश पंचरास यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम, सायंकाळी ८.३० वाजता सिने कलाकार राधिका पाटील आणि सहकारी यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवसाची सांगता होणार आहे.
























Join Our Whatsapp Group