पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीमध्ये माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कै.सौ.सुमनताई बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ श्री काळभैरवनाथ कथेचे आयोजन शनिवार दिनांक ५ व ६ ऑगस्ट तसेच कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सोहळ्याचे आयोजन दिनांक ७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे.
कथेचे निरुपण सौ.संगीताताई येनपुरे-चोपडे करणार आहेत. झी टॉकीज प्रस्तुत गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाअंतर्गत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ ते २, दुपारी ३ ते ६,सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये होणार आहे तसेच दिनांक ७ ऑगस्ट रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तसेच कार्यक्रमाचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट, सावता सेवक ट्रस्ट, राजेंद्र वाघेरे, हरिष वाघेरे, भाऊसाहेब राक्षे, ऋषिकेश वाघेरे, रंजनाताई जाधव करणार आहेत.
























Join Our Whatsapp Group