पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड येथील नामवंत उद्योजक आणि ख्यातनाम बॉडी बिल्डर उमेश विश्वनाथ जोगळेकर (वय ५६) यांचे सोमवारी ह्र्दयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, विवाहित बहिण असा परिवार आहे.
पिंपरी चिंचवड बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सहसचिव होते. पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे ते साडू होत. शहरातील राजकीय, उद्योग, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सह विविध क्षेत्रात त्यांचे योगदान होते.
गुरुवारी दि.७ रोजी सकाळी ९ वाजता निगडी येथील स्मशानभूमि येथे अंतिम संस्कार होणार असल्याचे जोगळेकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.





















Join Our Whatsapp Group