पिंपरी (Pclive7.com):- पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर वडीलांनीच अत्याचार केल्याची दुर्दैवी व धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या घटनेचा मुलीच्या आईला धक्का बसल्याने काल तिने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार पतीला अटक करण्यात आली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक आहे. त्याने दारूच्या नशेत ८ दिवसांपूर्वी बायको अंघोळीला गेलेली असताना आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. आई अंघोळीवरून अाली असता तिने स्वतः डोळ्याने हा प्रकार बघितला व आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला ही मारहाण केली.
मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर तिने सांगवी पोलिसांत काल तक्रार दाखल केली. पोलिसांनी २५ वर्षीय बापाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group