पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनेनंतर पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे मळा याठिकाणी ग्राऊंटिंग करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.
झिंजुर्डे मळा परीसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची भेट घेऊन झिंजुर्डे मळ्यातील रस्त्याच्या दूरावस्थे बाबत माहिती दिली होती. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तातडीने महापालिका स्थापत्य विभागाला याबाबत कळविले आणि लवकरात लवकर यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी सूचना दिली होती.बशत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनामार्फत झिंजुर्डे मळा याठिकाणी रस्त्यावर ग्राऊंटिंग करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देत उपाययोजना केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.