पिंपरी (Pclive7.com):- लग्न अगदी एक दिवसावर आले असताना तरूणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. चिंचवड येथे राहत्या घरी काल (दि.१२) रात्री साडेनऊ वाजता गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.
सीमा दिलीप सकाटे (वय २२ रा. विद्यानागर, चिंचवड) असे मयत तरूणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचे उद्या (गुरुवार, १४ डिसेंबर) लग्न होते. घरात लगीन घाई सुरू होती. घरातील सगळी मंडळी लग्नाचा बस्ता घेण्यासाठी खरेदीला गेले होते. हातावर मेहंदी काढल्यामुळे सीमा घरीच होती व तिच्या सोबतीला तिची छोटी बहीण देखील घरीच होती.
मात्र बहीण घरा बाहेर जाताच तिने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बहीण जेंव्हा परत अाली तेंव्हा हा सारा प्रकार उघडकीस आला. या साऱ्या प्रकारामुळे लग्नघरावरच शोककळा पसरली. ज्या घरातून तिची वरात निघणार होती त्याच घरातून तिची अंतयात्रा निघाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिच्या आत्महत्येचे अद्याप कारण कळले नसून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group