पिंपरी (Pclive7.com):- थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळते पाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोसरी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून उकळते गरम पाणी येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे. हे पाणी एवढे गरम आहे कि प्लास्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान हा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.






















Join Our Whatsapp Group