पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सोमवारी (दि.०९) पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, युवा नेते निहाल पानसरे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, जयंत शिंदे, प्रशांत कापसे, गोविंद भोसले अमोल गाडेकर
आदी उपस्थित होते.
आझमभाई पानसरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर शहरात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. दरम्यान आज जयंत पाटील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी आझमभाई पानसरे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.