पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित फ क्षेत्रिय कार्यालयातील जनसंवाद सभा आज चांगलीच गाजली आहे. या सभेत निगडी, यमुनानगर, साईनाथ नगर, सेक्टर 22 परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात ‘चाय-बिस्किट’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाबाबत माहिती देताना सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्येच निगडी प्रभाग क्रमांक 13, यमुनानगर, निगडी, साईनाथ नगर, सेक्टर 22, या भागामध्ये गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा पाणीपुरवठा व्यवस्थित केला जात नाही. आपल्याच भागातील पाणी दुसऱ्या भागाला वळवल्यामुळे निगडी, यमुनानगर, सेक्टर 22 या भागात पाणी नागरिकांना मिळत नाही. वेळोवेळी प्रशासनाला पाणीपुरवठा विभागाला तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही.
म्हणूनच आज जनसंवाद सभेमध्ये जाऊन प्रत्येक अधिकारी यांना चाय बिस्किट स्वतःच्या हाताने खायला घातले. यावेळी निगरगट प्रशासनाला सांगण्यात आले की, माझ्या माता भगिनींना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा त्रास होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करा. पुढील सात दिवसात या भागाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन चिखले यांनी प्रशासनाला दिला आहे.
Tags: चाय बिस्कीट आंदोलनजनसंवाद सभापिंपरी चिंचवड मनसेपिंपरी चिंचवड महापालिकामनसेमहापालिका जनसंवाद सभामहाराष्ट्र नवनिर्माण सेनासचिन चिखले






















Join Our Whatsapp Group