पिंपरी (Pclive7.com):- आशिष जयप्रकाश राऊत यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे, उपबाजार पिंपरी विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा कारभार स्वीकारला.

आशिष राऊत हे मागील काही वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत भाजीपाला गटप्रमुख, केळी बाजार विभाग प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. त्यांची आता पिंपरी उपबाजार गटप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना आशिष राऊत म्हणाले की, पिंपरी फुलबाजार हे अल्पावधीतच नावारूपाला आलेले फुल बाजार आहे. हा फुलबाजार मध्यवर्ती ठिकाण असून या फुलबाजाराची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत आहे. हा बाजार आणखी कसा वाढेल आणि येथील शेतकर्यांना त्यांच्या मालाची किंमत कशी अधिकाधिक देता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. तसेच मावळ, मुळशी, खेड, राजगुरुनगर, मंचर या ठिकाणाहून येणार्या शेतकर्यांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी मी प्रयत्न असणार आहे.

तसे पाहता मार्केटयार्ड पेक्षा पिंपरी फुलबाजार हा सर्वांसाठी सोईचा असून तो मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे तसेच येथून रेल्वे, मेट्रो व बसची सुविधा असल्यामुळे पुण्याच्या धर्तीवर इथे आधुनिक असे फुलबाजार करता येईल का यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे. तसेच इथे येणारे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना ज्या काही समस्या भेडसावत असतील त्याचे निराकारण करण्यावर मी विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.





















Join Our Whatsapp Group