पिंपरी (Pclive7.com):- लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी घरी येत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.१४) पहाटे साडेपाचच्या सुमारास देहूगाव येथील माळीनगर परिसरात घडली.

कुंदन हिरालाल भगत (२३, रा. माळीनगर, देहूगाव) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घनश्याम राजेंद्र कुदळे (२०, रा. माळीनगर, देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. विनायक राजेंद्र कुदळे (२४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी वारंवार लोक घरी येत असल्याचे घनःश्याम याने विनायकला सांगितले. यावरून दोघा भावांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात घनःश्याम याने घरातील भाजी कापण्याचा चाकू विनायकच्या छातीच्या डाव्या बाजूला खुपसला. गंभीर जखमी झालेल्या विनायकचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group