रावेत, किवळे, मामुर्डीतील वीज समस्येवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
शंकर जगताप यांची महावितरण, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
पिंपरी (Pclive7.com):- मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या होत्या. इतर विभागांकडून झालेल्या खोदाई दरम्यान भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे समोर आले आहे. या समस्येची गंभीर दखल घेत, भविष्यात कोणत्याही विभागाने महावितरणशी परस्पर समन्वय साधल्याशिवाय खोदाईची कामे करू नयेत, असे स्पष्ट निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले आहे. . तसेच, परिसरातील धोकादायक डीपींची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघवा, या उद्देशाने महावितरण आणि पिंपरी चिंचवड मनपा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आमदार शंकर जगताप यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील वीज खंडित होणे, धोकादायक डीपी, विद्युत यंत्रणेची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले.

मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरात जोरदार पावसामुळे रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरात पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या होत्या. इतर विभागांकडून झालेल्या खोदाईदरम्यान भूमिगत वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे समोर आले आहे. या समस्येची गंभीर दखल घेत, भविष्यात कोणत्याही विभागाने महावितरणशी परस्पर समन्वय साधल्याशिवाय खोदाईची कामे करू नयेत, असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच, परिसरातील धोकादायक डीपींची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, कुणाल वाव्हळकर, रावेत-वाल्हेकरवाडी अध्यक्ष मोहन राऊत, श्रीकांत भोंडवे, दीपक भोंडवे यांच्यासह महावितरणचे अधिकारी रत्नदीप काळे, श्री. गिरी, श्री. मुंडे, श्री. लहाने, सुरेश गवारे आणि आशुतोष थोरात आदी उपस्थित होते.

गहुंजे येथे महापारेषण उपकेंद्र उभारणार..
आगामी काळात या भागाची विजेची वाढती मागणी आणि सक्षमीकरण लक्षात घेऊन महत्त्वाचे नियोजन करण्यात आले आहे. गहुंजे येथे २२०/२२ केव्ही, ३०० MVA क्षमतेचे नवीन महापारेषण उपकेंद्र उभारण्यात येत आहे याबबत सविस्तर चर्चा झाली. पुढील आठवड्यात महापारेषण आणि सर्व संबंधित विभागांची एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group