पिंपरी (Pclive7.com):- अखिल विशाल नगर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित भव्य दांडिया व गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रतिष्ठान कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. या पूर्वीही स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत. आयोजित कार्यक्रमात घटस्थापने पासून ते विजयादशमी पर्यंत दररोज विविध सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दररोज भेटी दिल्या आहेत.

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणुकीने देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दररोज हजारो देवीचे भक्त आरतीच्या वेळी उपस्थित आसतात. रात्री ठरवून दिलेल्या वेळेनुसारच दांडिया व गरब्याचा कार्यक्रम पार पडतो. त्यात परिसरातील अनेक देवीचे भक्त आणि परिसरातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यातील नागरिक येऊन गरब्याचा आनंद घेऊन स्वतःला धन्य माणून प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या. शनिवार दि.२१ रोजी सातव्या माळीला भव्य चंडिका पूजा यज्ञ होम हवन पूजा अर्चा करण्यात आली. त्यात ५१ जोडप्यांनी सहभाग घेतला. यावेळी विशालनगर परिसरामध्ये भव्य धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी मनोभावे देवीचे मनोभावे दर्शन घेत मनातील अशा अकांक्षा सुख समृद्धी साठी प्रार्थना केली.

तसेच दि.२२ रोजी स्वर्गीय आमदार लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून देश सेवेला हातभार लाऊन सहकार्य केले. तसेच आज सोमवारी दि.२४ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचा बक्षीस वितरणाचा समारंभ होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार बालवडकर यांनी दिली.
Tags: Pcmc newsVishalnagarचंडिका यज्ञनंदकुमार बालवडकरनवरात्र उत्सवविशालनगरविशालनगरमध्ये चंडिका यज्ञ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न






















Join Our Whatsapp Group