पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी येथील कै. नंदा भोजने प्रतिष्ठान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान यांच्या वतीने नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. परिसरातील घरेलू कामगार महिला, कष्टकरी महिलांचा औक्षण करुन प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231014-WA0012-300x150.jpg)
यावेळी सौ. अनिता भारगंडे म्हणाल्या की, दररोज आपण आपल्या घरात कामवाली मावशीची वाट बघत असतो, एक दिवस सुध्दा मावशी कामाला नाही आल्या तर आपण बैचेन होतो. त्यांची सारखी धावपळ असते. रेणुकाताई दिपक भोजने (गजबरे) यांनी आज स्वतः औक्षण करुन महिलांचा सत्कार केला. औक्षण करतांना महिलांच्या चेहर्यावरचा आनंद बरेच काही सांगून जात होता.
यावेळी अनिता भारगंडे यांनी महिलांना मोफत आरोग्य तपासणी बाबत महिती दिली. तसेच उपस्थित महिलांना मोफत तपासणी कूपन देण्यात आले. पुढे त्या म्हणाल्या हे कूपन आमच्या Diagnopein Dianostics centre येथे देऊन मोफत तपासणी करू शकता. यावेळी कल्पना सकट, मनिषा चव्हाण, फरीदा शेख, संगीता खडसरे, लता दास, रेष्मा सकट आदी महिला उपस्थित होत्या.