पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे.
येत्या १ जानेवारी २०१८ पासून पिंपळे सौदागर येथे कोणताही दुकानदार किंवा विक्रेता प्लास्टिक पिशवी देणार नाही. त्यासाठी नागरिकांनी स्वतः कापडी पिशवी घेवून दुकानात जावे लागणार आहे. सर्व नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून प्रत्येक दुकानात “प्लास्टिक पिशवी दुकानदार देणार नाही” अशा स्वरूपाचा मजकूर असलेले सूचना स्टिकर्स प्रत्येक दुकानात नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने तीन दिवस अगोदर चिटकावण्यात आले आहेत.
हे स्टीकर्स ग्राहकांना दिसतील अशा दुकानाच्या दर्शनी भागात लावण्यात येत आहेत. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले,“पिंपळे सौदागर येथील सर्व नागरिक सुज्ञ व उच्चशिक्षित असल्यामुळे पिंपळे सौदागर प्लास्टिकमुक्त करण्यासठी नागरिक व दुकानदार सहकार्य शंभर टक्के सहकार्य करतील”.






















Join Our Whatsapp Group