पिंपरी (Pclive7.com):- भाजपचे कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने निषेध करण्यात आला.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, महिला अध्यक्षा गंगा धेंडे, फजल शेख, पुष्पा शेळके, आशा शिंदे, नजीर पटेल, विशाल काळभोर, मीनाक्षी उंबरकर, शकुंतला भाट, वंदना कांबळे, रुपाली गायकवाड, वर्षा जगताप, संगीता ताम्हाणे, विश्रांती वांजळे, आनंदा यादव, संगीता खरात आदी उपस्थित होते.
कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कुकानूरमधील ब्राह्मण युवा परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना हेगडे म्हणाले की, राज्यघटनेने आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणण्याचा अधिकार दिला आहे, आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. आम्ही राज्यघटनेचा आदर करु, पण याच राज्यघटनेत अनेकदा बदलही करण्यात आले आहेत, आणि भविष्यातही होतील. आम्ही राज्यघटना बदलण्यासाठी इथे आलो आहोत, आणि ती बदलणारच.’ अशा संविधाना विरोधी असणा-या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजप सरकार हाय-हाय, अनंत हेगडे यांचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई व पत्नीला पाकिस्तान सरकारने अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्या आई व पत्नीला जाधव यांना भेटताना मंगळसूत्र काढायला भाग पाडले, तसेच पाकिस्तान सरकारने भारतीय संस्कृतीचा अपमान केला, याबद्दल पाकिस्तान सरकारचा निषेध करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group