पिंपरी (Pclive7.com):- यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई वाहिनीवर महामार्ग सुरक्षा विभाग केंद्र वडगाव हद्दीत कि.मी ७४/९०० व खंडाळा हद्दीत कि.मी ५६/९०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम आज गुरुवारी (दि.७) १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात जुना मुंबई – पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम गुरुवारी दुपारी १२ वा ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने किवळे पुलावरून जुना मुंबई – पुणे महामार्गावरून मुंबई दिशेला वळविण्यात येणार आहे. पुणे ते मुंबई जुना महामार्गावरून येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोल नाका येथून एक्सप्रेस वेवर मुंबई दिशेने सोडण्यात येणार आहेत.
Tags: Pune Mumbai express way
























Join Our Whatsapp Group