पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शहरातील आदर्श शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.०९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कॅम्प एज्युकेशन सोसायटी प्राधिकरण, निगडी येथे आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) सुनंदा वाखारे ह्या प्रमुख पाहण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभूणे असणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, सचिव संभाजी पडवळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Tags: आदर्श शाळागुणवंत मुख्याध्यापकगुणवंत शिक्षकगुणवंत शिक्षकेतर कर्मचारीपिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघमुख्याध्यापक संघाच्या वतीने शनिवारी पुरस्कार सोहळा
























Join Our Whatsapp Group