पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवक मेळावा उद्या (दि.०६ शनिवारी) पिंपळेगुरव येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली. या मेळाव्यात नवीन पदनियुक्त्या केल्या जाणार आहेत.
पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्य मंदिरात शनिवारी दुपारी चार वाजता हा युवक मेळावा होणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील असणार आहेत. या मेळाव्यात संग्राम कोते पाटील युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी पक्षाने सुरु केली आहे. या मेळाव्यात नवीन पदनियुक्त्या केल्या जाणार असून निवडीचे पत्र दिले जाणार आहेत, अशी माहिती वाकडकर यांनी दिली.
या मेळाव्याला पक्षाचे माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group