पिंपरी (Pclive7.com):- दि.लिडर ऑफ आजाद दस्ता, कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, स्वातंत्र्यसूर्य अँड.विठ्ठल उर्फ वीरभाई कोतवाल यांच्या ७५ व्या स्मृती दिनानिमित्त हुतात्मा भाई कोतवाल चौक फुगेवाडी येथे नगरसेवक माऊली थोरात, भाजपा शहर सचिव विशाल वाळुंजकर, अल्पसंख्यांक आघाडी उपाध्यक्ष अमीर शेख, युवामोर्चा उपाध्यक्ष विशाल सातपुते, वीर भाई कोतवाल मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाळुंजकर, कार्याध्यक्ष पुंडलिक सैदाने, महा.नाभिक महामंडळ अध्यक्ष अशोक मगर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी दापोडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी आय.टी.सेल प्रमुख सुधीर चव्हाण, राजू कानडे, विष्णू आडागळे, रोहित काटे, अशोक पंडित, नितीन कुठे, सुनील साळवे, युवराज वाळुंजकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.