पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील डी-मार्ट समोर, टपरी पथारी हातगाडी पंचायत शाखेचे उद्घाटन आज दुपारी पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पंचायत अध्यक्ष रमेश शिंदे, कष्टकरी कामगार पंचायत सचिव धर्मराज जगताप, शाखा अध्यक्ष मुराद मुल्ला, सुरेश पवार, इम्रान शेख, मिथुन मधरे, मेहबूब शेख, जहागीर कुरेशी आदी उपस्थित होते.
यावेळी हातगाडी टपरी धारकाचे फॉर्म भरून घेण्यात आले. या भागातील हातगाडी टपरी धारकाचा सर्व्हे पिंपरी चिंचवड महापालिकेने केला नाही. हा सर्व्हे महापालिकेने करावा त्यांना परवाने द्यावेत अशी मागणी बाबा कांबळे यांनी यावेळी केली.
या भागातील, हातगाडी धारकांवर महापालिकेच्यावतीने सतत कारवाई केली जात असल्याची तक्रार मुराद मुल्ला यांनी व्यक्त केली. प्रल्हाद कांबळे रमेश शिंदे धर्मराज जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मेहबूब नदाफ, पवन सोली, सदाशिव रायमाने, चंद्रकांत करंगळे, विलास मस्के, सुनील मस्के, बंदुभाई बागवान, रत्नप्रभा नवघर, विलास सूर्यवंशी, सरिता धडे, खलील इदोरा, बाळू रटाळ यांनी परिश्रम घेतले.

























Join Our Whatsapp Group