संदेश पुजारी (Pclive7.com):- राजकारणात खरे तर तुम्ही कितीही मोठे झाला तरी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी भाग्य लागते… अगदी नगरसेवक होण्यासाठी ही… हे भाग्य काही जणांना लाभतं तर काही जण कितीतरी वर्षे त्याच्या प्रतिक्षेत असतात…! पण काही जणांच्या भाग्यात निवडणुकीत पराभव झाला तरी नगरसेवक होण्याचे भाग्य असते… स्वीकृत नाही…! असेच भाग्य लाभले आहे भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर यांना…
इंद्रायणीनगर प्रभागातून महापालिकेच्या निवडणुकीत सारंग कामतेकर यांचा पराभव झाला असला तरी ते नगरसेवक झालेत… तुमचा विश्वास नसेल तर जीवनविद्या मिशनचा भोसरीमध्ये लावलेला हा फ्लेक्स पहा… आमदार महेश लांडगे आयोजित “तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार” या कार्यक्रमाचे संपूर्ण मतदारसंघात फ्लेक्स लावले आहेत. त्यात प्रत्येक प्रभागातील भाजपच्या स्थानिक नगरसेवकांचे फोटो लावण्यात आलेत. त्यानुसार इंद्रायणीनगर प्रभागातील फ्लेक्सवर तीन भाजपच्या विद्यमान नगरसेवकांसोबत सारंग कामतेकर यांचा फोटोही आहे. त्यानुसार ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक झालेत. म्हणजे त्या फ्लेक्सवर तसा त्यांच्या फोटो खाली तसा उल्लेख झाला आहे… याबाबत चौकशी केली असता नजरचुकीने कामतेकरांच्या फोटो खाली नगरसेवक असा उल्लेख झाल्याचे आयोजकांचे म्हणणे असून ते लवकरच दुरूस्त करू असं ही ते म्हटले.
आता एका निवडणुकीत पराभूत झाले म्हणजे ते परत निवडून येणार नाहीत असे नाही…! ते निवडून येतील पण तूर्तास ते फ्लेक्सवर ‘नगरसेवक’ झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा…!



















Join Our Whatsapp Group