पिंपरी (Pclive7.com):- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन केले आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० मधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मुले व मुली प्राथमिक विद्यालय व कै. सौ.मिनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार होते.
या शाळेचे नूतनीकरनाचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात झाले होते. या प्रभागातील नगरसेवक रोहित आप्पा काटे, स्वाती उर्फ माई काटे व राजू बनसोडे यांना विश्वासात घेतले नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे निमंत्रण न देता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळेच या इमारतीचे उद्घाटन आज राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक रोहित आप्पा काटे, माई काटे, निकिता कदम, सुलक्षणा धर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश संघटक विशाल काळभोर व कविता खराडे उपस्थित होते.