रस्ते विकसित..
पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे ६१ किलोमिटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यात वाकड, पुनावळे, ताथवडे, पिंपळे सौदागर, चिखली, जाधववाडी, बोहाडेवाडी, मोशी, चन्होली, तळवडे, दिघी, डुडुळगाव, वडमुखवाडी, कुदळवाडी या भागातील रस्ते विकसित करणेचे नियोजन आहे.
सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प..
चिंचवड येथे सिटी सेंटर, मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारणे, नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम विकसित करण्यात येणार आहे.
पुल उभारणी..
मुळा नदीवर सांगवी – बोपोडी येथे पुल उभारणी, पिंपरी येथील डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधणे, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सब वे बांधण्यात येणार आहे. मामुर्डी सांगवडे येथे पवना नदीवर पुल उभारण्यात येणार आहे.
मोठ्या इमारती..
मोशी येथे ७०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. आकुर्डी गावठाण येथे वारकरी भवन उभारण्याचे नियोजन केले आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोर पिंपरी चिंचवड महापालिकेची नवीन मुख्य प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये..!
• महापालिकेच्या विकास कामासाठी १८६३ कोटी तरतूद
• आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी १९० कोटी
• स्थापत्य विशेष योजनांसाठी १०३१ कोटी ७९ लाख
• शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी
• महिलांच्या विविध योजनांसाठी ६१ कोटी ५८ लाख
• दिव्यांग कल्याकणारी योजना ६५ कोटी २१ लाख
• पाणीपुरवठा २६९ कोटी ८९ लाख
• पीएमपीएमएलसाठी २६९ कोटी ८९ लाख
• भूसंपादनकरिता १०० कोटी
• स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपये तरतूद.