पिंपळे सौदागर (Pclive7.com):- दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या पावसाने अतिवृष्टीचे रूप घेतले. सतत पडणार्या पावसामुळे प्रभागतील काही ठिकाणी पाणी साचले आहे. या परिस्थितीची गंभीरपणे दखल घेत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तातडीने महापालिका अधिकार्यांसोबत पाणी साचलेल्या परिसरात जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अश्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काल पिंपरी चिंचवड शहरातच नाही तर संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाची संततधार सुरू असल्याने प्रभागात काही ठिकाणी पुरस्थिती सारखी परिस्थिति निर्माण झाली होती. ज्या ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या होत्या त्या ठिकाणी ते तातडीने हटवण्यात आले. या भागात पाणी साचले होते तेथून पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना काटे यांनी प्रशासनाला गेले.

दरम्यान अद्याप अजूनही पावसाळा बाकी आहे. त्यामुळे पुन्हा अशा सखल भागात पाणी साचणार नाही त्याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्यात यावेत. तसेच ज्या भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला आहे त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात यावी जेणेकरून रोगराईचा फैलाव होणार नाही अशा सूचना शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group