पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी आज महापालिका सभागृहात दाखल होऊन हजेरी लावली आहे. फरार हिंगे महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहचतात पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजप नगरसेवक हिंगे यांच्या विरुध्द पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी त्यांना पोलिसांकडून अजूनही अटक झालेली नाही. ते अद्याप फरार आहेत. मात्र, फरार असलेल्या हिंगे यांनी आज २० जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजता झालेल्या महापालिका सभेत उपस्थित राहून हजेरी लावली आहे.
दरम्यान, निगडी पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे म्हणाले की, तुषार हिंगे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तीन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून ते सध्या फरार आहेत.
तुषार हिंगे फरार असताना महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहचतात. मात्र, पोलीस यंत्रणा हिंगे यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. याबाबच आश्चर्य व्यक्त केले आहे. हिंगे अजून किती दिवस पोलिसांपासून फरार राहणार, असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.