पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व डाॅ. शैलेश मोहीते पाटील आदी उपस्थित होते.
प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा ते पक्ष कार्यात सक्रीय झाले होते. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेतील भाजप पदाधिकार्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शितोळे यांनी आवाज उठवला आहे.