पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली.
मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा केल्यानंतर या जागा जाहीर करत असल्याचे ते म्हटले. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार याची चर्चा रंगली होती. अखेर काल निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे आहेत उमेदवार..
वर्धा – अमर काळे, दिंडोरी – भास्करराव भगरे, बारामती – सुप्रिया सुळे, शिरूर – अमोल कोल्हे, अहमदनगर – निलेश लंके.