पुणे (Pclive7.com):- बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
सुप्रिया सुळे बारामतीत विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे, अशी लढत होणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लक्षवेधी लढत या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
यापूर्वी अजित पवार यांनी बारामतीत बोलताना मतदारांना भावनिक आवाहन केले होते. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांनी वेढलेला उमेदवार निवडून द्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.
अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पदमसिंह पाटील हे माजी मंत्री आहेत, तर त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत.
























Join Our Whatsapp Group