पिंपरी (Pclive7.com):- रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालत असताना हॉटेल व्यावसायीकाने हटकले म्हणून आठ ते नऊ जणांनी मिळून व्यावसायीकाला मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२८) थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी शाकीर फकीर शेख (वय 40 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रिक्षा चालक ऋषिकेश राजेंद्र वारभवन (रा. थेरगाव), ओमकार विठ्ठल बोनागिरे, काकासाहेब नानासाहेब पवार, रणजित भिमराव बजबळकर, युवराज विठ्ठल बोनागिरे, साहिल वारभवन यांना अटक केली आहे. इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा रस्त्यात लावून दारु पिऊन गोंधळ घालत असताना फिर्यादीने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावरून आरोपी ऋषिकेश याने त्याच्या साथिदारांना बोलावून त्याने फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्या हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केली. यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.























Join Our Whatsapp Group