पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती पिंपरी न्यायालयात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात वकील बार रूम मधील सर्व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून झाली.
याप्रसंगी विविध वकील मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान यावर व्याख्याण व मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता संविधानाची प्रास्तावना वाचन करून झाली. त्यानंतर पिंपरी चौक येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राजेश पुणेकर, उपाध्यक्ष योगेश थंबा, ॲड. नितीन क्षीरसागर, ॲड.शंकर घंगाळे तसेच मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड.प्रतिक्षा खिलारी, सचिव ॲड.धनंजय कोकणे, सह-सचिव ॲड.उमेश खंदारे व विद्यमान कार्यकारणी यांनी केले होते.
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड न्यायालयमहात्मा ज्योतिबा फुले जयंती