पिंपरी (Pclive7.com):- राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांचा ५५ वा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यावतीने थोर साधू मोरया गोसावी मंदिरात माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाजपा शहर उपाध्यक्ष विजय शिनकर यांच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील कामायनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
त्याचबरोबर जमीर मुल्ला यांच्यावतीने श्रमिकनगर येथील उर्दू शाळा, गणेश लंगोटे यांच्या वतीने मोहननगर येथील अपंग रोजगार प्रशिक्षण केंद्र, नगरसेवक केशव घोळवे व वैजनाथ शिरसाठ यांच्या वतीने चिंचवड येथील महात्मा फुले शाळा, अनुसूचित मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुभाष सरोदे यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालय व भोसरी येथील यशवंतराव चव्हाण अनुसूचित विद्यालय, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक यांच्या वतीने डूडुळगाव येथील आनंदाश्रम कुष्ठरोगी आश्रम व राधिका बोर्लीकर यांच्या वतीने आकुर्डी येथील संत मौनी साहेब वृद्धआश्रम या विविध ठिकाणी खाऊ वाटप आणि फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर पिंपरी चिंचवड अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मनोज तोरडमल यांच्या वतीने चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथील विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधून पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष कैलास कुटे यांनी कामायनी शाळेसाठी ५ हजार रुपयांची तर प्रकाश जवळकर यांनी यशवंतराव चव्हाण अनुसूचित आश्रमशाळेसाठी दहा हजार रुपयांची रोख मदत केली.
याप्रसंगी वेणू साबळे, नगरसेवक माऊली थोरात, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक केशव घोळवे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, रघुनंदन घुले, प्रकाश जवळकर, मनोज तोरडमल, विजय शिनकर, सुभाष सरोदे, विशाल वाळुंजकर, वैजनाथ शिरसाठ, दीपाली धानोकर, राधिका बोर्लीकर, दीपक रोकडे, दीपक नागरगोजे, अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना वेणू साबळे म्हणाल्या की, खासदार अमर साबळे यांची नाळ समाजातील दुर्लक्षित व पीडित लोकांशी जुळलेली आहे. त्यांच्या मनात या शोषित आणि पीडित घटकांविषयी प्रचंड तळमळ आहे. त्यांच्या या अंत्योदयाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या अनुपस्थितीत शहरातील कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस समाजातील असाच वंचीत व दुर्लक्षित घटकांसोबत सेवाभावी वृत्तीने उत्साहात साजरा करून हा वाढदिवस वंचित समाजासाठी समर्पित केला आहे, असे त्या म्हणाल्या.






















Join Our Whatsapp Group