पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील भाटनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक राजकिय पुढार्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र शिवव्यापारी सेनेच्या आंदोलनामुळे आज या घाणीच्या साम्राज्यावर यशस्वी ‘सर्जिकल स्टाईक’ झाला असल्याची माहिती शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी दिली.
याबाबत युवराज दाखले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून भाटनगर परिसरात घाणीचे साम्राज्य होते. मात्र शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेनेने या समस्येला वाचा फोडण्यासाठी मोरवाडी चौकातील आहिल्यादेवी पुतळा येथे निदर्शने केली होती. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. सहाय्यक आयुक्त प्रमोद अष्टिकर यांनी तात्काळ दखल घेऊन आरोग्य निरिक्षकांना या ठिकाणी स्वच्छतेचे आदेश दिले. त्यानंतर आज भाटनगर येथील विद्युत पुरवठा खंडीत करून स्वच्छता मोहीम करण्यात आली. यावेळी दोन ट्रक कचरा उचलून नेण्यात आला. तसेच परिसरात औषध फवारणी देखील करण्यात आली.
या घाणीच्या साम्राज्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले व शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या महिला शहर संघटिका भाग्यश्री मस्के,शिवसेना महिला विभागप्रमुख सारीका तामचिकर, शिवसैनिक दिपक कांबळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, नवनाथ गारगुटे यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group