पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागार-रहाटणी येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. बुधवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या मार्गासाठी स्थायी समितीमध्ये सिमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्मला कुटे यांनी २८ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
पिंपळे सौदागार-रहाटणी तसेच साई चौकात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. या परिसरातील नागरिकांना रस्त्याने चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढती वाहन संख्या आणि वाहतुक कोंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे यांनी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग मार्गी लागण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. स्थायीच्या आज झालेल्या बैठकीत या मार्गाच्या कामासाठी २८ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक जलद आणि सुरळीत होऊन कोंडीतून सुटका होणार आहे.






















Join Our Whatsapp Group