पिंपरी (Pclive7.com):- सत्यम ज्वेलर्स ह्या अक्षय तृतीयेच्या संपन्न मुहूर्तावर ४१ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. ज्वेलरी इंडस्ट्रीमधला एक ग्राहकप्रिय ब्रँड अर्थात ग्राहकांच्या मनातलं नाव म्हणजे सत्यम ज्वेलर्स! खरं सांगायचं तर, सोने-चांदी जगतात आपलं अस्तित्व जपणं आणि वेगळं स्थान निर्माण करणं काहीशी अवघड गोष्ट आहे पण आपल्या नम्र ग्राहक सेवा, सचोटी, दागिन्यांची विविधता-सुंदरता, चोख आणि पारदर्शी व्यवहार ह्या अंगभूत गुणांमुळे सत्यम ज्वेलर्स अल्पावधीतच ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
गेली ४१ वर्षे सत्यम ज्वेलर्स यांनी ज्वेलरी इंडस्ट्रीमधे आपलं आगळं-वेगळं स्थान जपलं आहे ते आपल्या ग्राहकांच्या पाठींब्यामुळेच! गेल्या ४१ वर्षांत ज्वेलरी इंडस्ट्रीमधे अनेक ट्रेंड्स आले, बरेच सारे नवे बदल आपणांस अनुभवायास मिळाले. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या डिझाइन्स पासून ते ग्राहकांच्या आवडी-निवडीमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण हे सगळॆ बदल टिम सत्यम ज्वेलर्सने वेळोवेळी स्वीकारले आणि आपल्या ग्राहकांच्या आनंदासाठी त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. त्याचाच परिणाम म्हणजे सत्यम ज्वेलर्स आणि ग्राहक यांचे नाते दृढ होत गेले तसेच नव्या पिढीमधलेही ग्राहक सत्यमशी आपुसकच जुळत गेले.
४१ वर्षांचा आपला अनुभव सांगताना सत्यम ज्वेलर्सचे सर्वेसर्वा श्री. किरणराज चोपडा सांगतात की, “सत्यम ज्वेलर्सचा ४१ वा वर्धापन दिन साजरा करताना खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. सत्यम ज्वेलर्सची सुरुवात एका छोट्या रोपट्याच्या रूपात निगडी, पिंपरी-चिंचवड येथे झाली. “ग्राहक” हाच देव, आणि त्यालाच प्रथम स्थानी ठेवून सत्यम ज्वेलर्स उद्योग समूहाचा पाया रचला गेला. सत्यम ज्वेलर्सच्या प्रत्येक निर्णयात “ग्राहक हिताला” प्रथम प्राधान्य दिले जाते. सोन्या-चांदीचा भाव आणि दागिन्यांच्या घडणावळीचा भाव हा ग्राहकांसाठी नेहमीच पारदर्शी आणि रास्त ठेवला जातो.
सत्यम ज्वेलर्स सोबत समाजातल्या प्रत्येक घटकांतले ग्राहक जुळलेले आहेत. छोटया-छोट्या खरेदीपासून ते अगदी मोठ्या खरेदीपर्यंत ग्राहक आनंदाने सत्यम ज्वेलर्स मध्ये खरेदी करीत असतात आणि ह्या प्रत्येकाची आवड-निवड जपण्याची जबाबदारी टिम सत्यम ज्वेलर्स जबाबदारीने पार पाडत असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सत्यम ज्वेलर्सच्या त्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. आज सत्यम ज्वेलर्स उद्योग समूह निगडी, कृष्णानगर आणि चाकण येथे सुंदर आणि भव्य रूपात कार्यरत आहे.”
सत्यम ज्वेलर्स उद्योग समूहाची सध्याची धुरा सत्यम ज्वेलर्सचे डायरेक्टर्स श्री. महावीर चोपडा, दिपक चोपडा आणि राहुल चोपडा अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. सत्यम ज्वेलर्सचे डायरेक्टर श्री. महावीर चोपडा आणि श्री. दिपक चोपडा सांगतात की, “ग्राहक दागिने निवडीबाबत खूप चोखंदळ असतात. त्यांच्या मागणीनुसार दागिने उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सोने खरेदीचा आनंद अमर्यादित वाढवणे ह्यावर आम्ही भर देतो. ह्याचाच भाग म्हणून ह्या वर्षी सत्यम ज्वेलर्सने पिंपरी चिंचवड मधील सर्वात मोठे ५००० स्क्वे.फु. चे सत्यम सिल्व्हर शोरूम आपल्या ग्राहकांसाठी निगडी येथे सुरु केले आहे. ह्यामध्ये चांदीचे विविध दागिने, कॉर्पोरेट गिफ्ट्स, इत्यादीच्या असंख्य व्हरायटीज आपणांस मिळतील.”
सत्यम ज्वेलर्स कडून आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करत असताना डायरेक्टर श्री. राहुल चोपडा सांगतात की “सत्यम ज्वेलर्सला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं गरजेचे होते. ज्वेलरी इन्व्हेंटरी स्टॉक मॅनेजमेन्ट पासून ते बिलिंग पर्यंत आणि ब्रॅंडिंग पासून ते मार्केटिंग पर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये तंत्रज्ञान वापरून सत्यम ज्वेलर्सला आधुनिक करणं ह्यावर आमच्याकडून गेल्या १० वर्षांत भर दिला गेला. तसेच ग्राहकांना सोने खरेदी कधी ही आणि कुठे ही करता यावी म्हणून सत्यम ज्वेलर्सनी आपल्या ग्राहकांसाठी “सत्यम डिजी-गोल्ड ऍपची” सुरुवात केली. यामध्ये आपण आपल्या सोईनुसार सोन्याची खरेदी अगदी घरबसल्या करू शकता.
याशिवाय सत्यम ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी सोने गुंतवणूकीचे अनेक प्लॅन्स ही उपलब्ध करून दिले आहे, ग्राहक अनेक वर्षांपासून ह्या प्लॅन्सचा लाभ घेत आहेत. ४१ वा वर्धापन दिन आणि अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर आपल्या ग्राहकांची सोने खरेदी समृद्ध व्हावी यासाठी सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहेत एक समृद्ध ऑफर. “हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट ५०% तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% पर्यंत सूट दिली जाणार आहे आणि जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर ०% घट आकारली जाईल.”ह्या ऑफरचा कालावधी 25 एप्रिल 2024 ते 15 मे 2024 पर्यंत वैध आहे.
याशिवाय सत्यम ज्वेलर्सने लग्नसराईसाठी खास वेडींग आणि अँटीक ज्वेलरी कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. सत्यमच्या अँटीक ज्वेलरी कलेक्शनच्या कमी वजनाच्या तरीही अप्रतिम सुंदर अशा या दागिन्यांची ग्राहकांमध्ये क्रेझ आहे आणि हे दागिने खरेदी करण्यासाठी सत्यमच्या तिन्ही शोरूम्समध्ये ग्राहक गर्दी करीत आहेत.
सत्यम ज्वेलर्स तर्फे ४१ वा वर्धापन दिना-निमित्त आपल्या सर्व ग्राहकांचे हार्दिक अभिनंदन! अक्षय्य तृतीयेचा हा समृद्ध मुहूर्त साजरा करूया सत्यम ज्वेलर्स सोबत!